महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे शेतकर्यांसाठी 'अमृत सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्ग' आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत सातारा येथे पार पडणार आहे. शाश्वत शेती, जमिनीचे पुनरुज्जीवन, पीक पोषण, कीड नियंत्रण आणि प्रत्यक्ष शेती भेटीद्वारे प्रात्यक्षिकांवर या वर्गात भर दिला जाईल.
महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने 'समृद्ध शेतकरी, समृद्ध भारत' आणि 'शाश्वत शेती, स्वावलंबी भारत' या ध्येयांतर्गत 'अमृत सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्ग' आयोजित करण्यात आला आहे. शेतीतील वाढता खर्च कमी करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण कालावधी व वेळ: • दिनांक: १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ • वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
प्रशिक्षण वर्गातील प्रमुख सत्रे: 1. सत्र १: सेंद्रिय शेती - मूलभूत संकल्पना
o जमिनीची पूर्वतयारी व माती परीक्षण.
o मातीच्या pH नुसार योग्य पीक पद्धतीची निवड.
o जमिनीचे पुनरुज्जीवन आणि सुपीकता वाढवण्यासाठी सखोल मार्गदर्शन.
2. सत्र २: मशागत व पीक पोषण नियोजन
o योग्य मशागत पद्धतींचा स्वीकार व सेंद्रिय खतांचा वापर.
o सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत व त्याचे नियोजन.
o मशागत व खत वापराचे तांत्रिक नियोजन.
3. सत्र ३: बहुपीक पद्धती व एकात्मिक कीड नियंत्रण
o सेंद्रिय शेतीत बहुपीक पद्धतीचा अवलंब.
o पिकाच्या वयानुसार पाणी व खत नियोजन.
o आच्छादनाचा (Mulching) वापर, जैविक रोग व कीड नियंत्रण.
o आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींचे एकत्रितीकरण.
4. सत्र ४: प्रत्यक्ष शेती भेट व प्रात्यक्षिक
o सेंद्रिय शेतीची प्रत्यक्ष भेट व प्रात्यक्षिके.
o अभ्यासू शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व प्रत्यक्ष कृती.
o प्रशिक्षणानंतर स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन.
कार्यशाळेचे इतर फायदे: या प्रशिक्षणामुळे मृदा आरोग्यात सुधारणा होऊन उत्पादन वाढेल, पिकांची सुरक्षा व आर्थिक समृद्धी लाभेल, बाजारात उच्च दर व बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. याशिवाय सहभागी शेतकऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि सरकारी योजनांची माहिती देखील दिली जाईल.
नाव नोंदणी व संपर्कासाठी माहिती: • फोन नंबर: 911 222 76 38 • पत्ता: अमृत जिल्हा कार्यालय,नगर वाचनालयासमोर, सेंट्रलप्लाझा बिल्डिंग, तिसरा मजला राजवाडा , सातारा)
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment