लातूर येथे गजानंद उमाकांत हवा यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट

वाडवणा, ता. उदगीर, जि. लातूर येथील गजानंद उमाकांत हवा यांनी अमृतच्या लातूर जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

लातूर येथे गजानंद उमाकांत हवा यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाडवणा, ता. उदगीर, जि. लातूर येथील गजानंद उमाकांत हवा यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा कार्यालय, लातूर येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार तसेच उद्योजकता विकास कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. समाजातील पात्र घटकांना शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.

या भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेण्यात आली. अशा सदिच्छा भेटींमुळे संस्थेच्या उपक्रमांचा प्रसार होण्यास आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचण्यास मदत होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Ajay Kulkarni News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Ajay Kulkarni News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement