अमृतच्या व्याज परतावा योजनेचा आधार; जालन्याच्या यशश्री शर्मा यांची पार्लर व्यवसायातून स्वावलंबनाकडे वाटचाल

शासकीय योजनेच्या मदतीने नवउद्योजिकेला आर्थिक बळ; स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यास मिळाली साथ

अमृतच्या व्याज परतावा योजनेचा आधार; जालन्याच्या यशश्री शर्मा यांची पार्लर व्यवसायातून स्वावलंबनाकडे वाटचाल मुख्य फोटो
मुख्य फोटो

स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी उद्योजिका बनण्याचे स्वप्न अनेक जणी पाहतात. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल आणि कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार ही त्यांच्यासमोरील मोठी आव्हाने असतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे नवउद्योजकांना आर्थिक आधार मिळत आहे. जालना येथील यशश्री शर्मा यांची यशोगाथा या योजनेच्या उपयुक्ततेचे उदाहरण ठरत आहे.

यशश्री शर्मा यांनी पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी बँकेकडून व्यावसायिक कर्ज घेऊन आवश्यक भांडवलाची उभारणी केली. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक नियोजनासोबतच कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याजाचा भार सांभाळणेही महत्त्वाचे होते. यासाठी त्यांनी अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती घेऊन योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला.

अमृत संस्थेने त्यांच्या अर्जाची व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार त्यांना कर्जावरील व्याज परताव्याचा लाभ दिला. या मदतीमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी करण्यास हातभार लागला. स्वतःच्या व्यवसायातून प्रगती साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळाले. नवउद्योजकांसाठी आर्थिक दिलासा अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लक्षित घटकातील पात्र उद्योजक व नवउद्योजकांना व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेल्या कमाल १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर नियमानुसार १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणे, कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आधार उपलब्ध करून देणे हा आहे.

यशश्री शर्मा यांचा हा प्रवास केवळ एका पार्लर व्यवसायापुरता मर्यादित नसून, योग्य नियोजन, व्यवसाय करण्याची जिद्द आणि शासकीय योजनांच्या मदतीने स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा योजनांमुळे पात्र नवउद्योजकांना स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी मदतीचा हात मिळत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 01:22 PM News publication time | Views: 693 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 01:22 PM News publication time | Views: 693 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement