जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या अमरावती येथील विभागीय कार्यालयास भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान जिल्हा उद्योग केंद्राचे फील्ड मॅनेजर श्री. सागर राऊत, बी.एफ.ई. मॅनेजर श्री. आदित्य सावडे आणि टेक्निकल मॅनेजर श्री. एम. पी. चौधरी उपस्थित होते.
जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या अमरावती येथील विभागीय कार्यालयास भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान जिल्हा उद्योग केंद्राचे फील्ड मॅनेजर श्री. सागर राऊत, बी.एफ.ई. मॅनेजर श्री. आदित्य सावडे आणि टेक्निकल मॅनेजर श्री. एम. पी. चौधरी उपस्थित होते. या भेटीचा मुख्य उद्देश उद्योजकांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती, स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच युवकांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करणे हा होता. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यात आली. अमृत संस्था ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षण, अमृत फ्रूट मार्ट , अमृत पेठ, अमृत मिनी मार्ट यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्र आणि अमृत संस्था यांच्या माध्यमातून उद्योजकांना योजनांची योग्य माहिती मिळावी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे आणि पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी परस्पर समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. या अनुषंगाने दोन्ही संस्थांच्या कार्यपद्धती व उपक्रमांबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. विशेषतः युवक, नवउद्योजक आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कौशल्याधारित व्यवसायांना चालना देणे आणि रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविणे यासाठी अशा संस्थांमधील समन्वय उपयुक्त ठरू शकतो. जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अमृतच्या विभागीय कार्यालयास दिलेल्या या भेटीमुळे विविध शासकीय उपक्रमांची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले. जिल्हा उद्योग केंद्र व अमृत संस्थेच्या समन्वयातून भविष्यात उद्योजकता विकास, स्वयंरोजगार आणि रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment