अहिल्यानगर येथील शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड यांची "अमृत दुर्गोत्सव 2026 निमित्त भेट

अहिल्यानगर येथील माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड यांची "अमृत दुर्गोत्सव 2026 निमित्त भेट

अहिल्यानगर येथील शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड यांची "अमृत दुर्गोत्सव 2026 निमित्त भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर येथील श्रीमती संध्या गायकवाड मॅडम (शिक्षणाधिकारी -माध्यमिक विभाग-जिल्हा परिषद)यांची अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी भेट घेऊन त्यांना ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ बाबत पत्र दिले व दुर्गोत्सवाचे स्वरूप,उद्देश व उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच त्यांच्या अधिकृत शासकीय आयडीवर मेल ही करण्यात आला आहे, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक विद्यालय येथे "अमृत दुर्गोत्सव 2026" बाबत पत्र पाठवणार आहेत.त्याचप्रमाणे अमृत वर्ग या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शना खाली (अमृत) महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून "अमृत दुर्गोत्सव 2026" हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमास शासन निर्णयान्वये प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्राप्त झालेली आहे.

दिवाळी सुट्टयांमध्ये गड/दुर्गाच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेस प्रोत्साहन देणे,दुर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तसेच,बालगोपाळ, युवक, कुटुंबे तसेच समाजातील विविध घटक यांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गाच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या इतिहासाची व शौर्यपरंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे यासाठी राज्यातील सर्व स्तरांतील जनतेचा सहभाग होणे अपेक्षित आहे. दिनाक 05 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान "दुर्गोत्सव 2026” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

amrutdurgotsav.com. या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी,युवा वर्ग तसेच संबंधित घटकांनी "अमृत दुर्गोत्सव 2026” मध्ये उत्स्फूर्त,स्वयंप्रेरित व सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच सदर उपक्रमास त्यांच्या स्तरावरून आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्यास विश्वविक्रमी दुर्गोत्सव 2025 प्रमाणे याही वर्षी म्हणजे "अमृत दुर्गोत्सव 2026” हा उपक्रम व्यापक लोकसहभागातून यशस्वीपणे राबविण्यास निश्चितच मदत होईल.

यावेळी वैभव कुलकर्णी हेही उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,हिंदू-लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता :- अमृत,वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 11:12 PM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 11:12 PM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement