नंदुरबारमध्ये ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमाचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

नंदुरबार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व दुर्गोत्सव मंडळांपर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्याचे आवाहन

नंदुरबारमध्ये ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमाचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाची नाशिक विभागातील सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांचा अधिकाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने अमृतचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. नमन गोयल यांची विशेष भेट घेतली. ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असून, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर या भेटीदरम्यान भर देण्यात आला. मागील वर्षीही नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला होता. यंदाही त्यापेक्षा अधिक व्यापक सहभाग मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून उपक्रमाची माहिती सर्वदूर पोहोचविण्याची विनंती जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केली. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच दुर्गोत्सव व दुर्गनिर्मितीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या भेटीदरम्यान योगेश अहिरे यांनी अमृत संस्थेच्या वतीने जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या अमृत संवाद सेतू, अमृत सेवा कार्य, विविध शासकीय योजनांची माहिती, प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर उपक्रमांबाबत CEO नमन गोयल यांना सविस्तर माहिती दिली. अमृतच्या लक्षित गटातील समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नमन गोयल यांनी अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच, अमृत संस्थेच्या उपक्रमांना जिल्हा परिषद कार्यालयाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली. या भेटीमुळे अमृत संस्था आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’सह अमृतच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 07:50 PM News publication time | Views: 202 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 07:50 PM News publication time | Views: 202 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement