अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून नांदेडचे श्री. मनोज मामिडवार यांना ₹८९,७५० चा लाभ!

अमृतच्या व्याज परतावा योजनेतून श्री. मनोज मामिडवार यांना ₹८९,७५० चा लाभ!

अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून नांदेडचे श्री. मनोज मामिडवार यांना ₹८९,७५० चा लाभ! मुख्य फोटो
अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून नांदेडचे श्री. मनोज मामिडवार यांना ₹८९,७५० चा लाभ! अतिरिक्त फोटो

अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून श्री. मनोज मामिडवार यांना ₹८९,७५० चा लाभ! *व्यवसायवाढीसाठी व्याज परताव्याच्या रकमेचा उपयोग करणार; इतरांनीही अमृतच्या योजनांचा लाभ घ्यावा – श्री. मनोज मामिडवार यांचे आवाहन* *नांदेड :* महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत नांदेड येथील लाभार्थी श्री. मनोज बालाजी मामिडवार यांच्या बँक खात्यात सहा महिन्यांचा एकूण *₹८९,७५० इतका व्याज परतावा* जमा झाला आहे. हा लाभ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आज अमृतच्या नांदेड जिल्हा कार्यालयाला भेट देऊन आपल्या अनुभवाबद्दल समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान अमृतचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ संतोष कुलकर्णी यांनी श्री. मनोज मामिडवार यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. प्राप्त झालेल्या व्याज परताव्याच्या रकमेचा उपयोग ते आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी करणार आहेत. अमृत संस्थेच्या या योजनेमुळे आर्थिक आधार मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, समाजातील इतर लक्षित गटातील पात्र लाभार्थ्यांनीही अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घ्यावी, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री. मनोज मामिडवार यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी तसेच संस्थेच्या माननीय व्यवस्थापकीय संचालकांचे आभार मानले. अमृत संस्थेच्या योजनांमुळे लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मिळणारे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. *अमृत संस्थेचा उद्देश केवळ योजनांची अंमलबजावणी करणे नसून, लक्षित गटातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या व्यवसायवाढीला चालना देणे हा आहे.* श्री. मनोज बालाजी मामिडवार यांना मिळालेला ₹८९,७५० चा व्याज परतावा हा या प्रयत्नांचा सकारात्मक अनुभव ठरत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 05:23 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 05:23 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement