सर्वोत्कृष्ट बातमीदार पुरस्काराबद्दल बीड येथील श्री कमलेश जाब्रस यांचा अमृततर्फे सत्कार

दैनिक ‘सकाळ’चे माजलगाव तालुका प्रतिनिधी श्री. कमलेश जाब्रस यांना सर्वोत्कृष्ट बातमीदार म्हणून तसेच जिल्ह्यात सर्वाधिक जाहिराती मिळवून दिल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट बातमीदार पुरस्काराबद्दल बीड येथील श्री कमलेश जाब्रस यांचा अमृततर्फे सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

माजलगाव : दैनिक ‘सकाळ’चे माजलगाव तालुका प्रतिनिधी श्री. कमलेश जाब्रस यांना सर्वोत्कृष्ट बातमीदार म्हणून तसेच जिल्ह्यात सर्वाधिक जाहिराती मिळवून दिल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करताना बातमीदारीसोबतच वृत्तपत्राच्या व्यावसायिक वाढीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे माजलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी आणि अमृत मित्र श्री. सुमित धिरडे यांनी कमलेश जाब्रस यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*कमलेश जाब्रस यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 💐*

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 02:29 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 14-10-2026 News publication date | Time: 02:29 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement