जळगाव जिल्ह्यात वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाला आर्थिक फायदा मिळाला लाभ

जळगाव जिल्ह्यात वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाला आर्थिक फायदा मिळाला लाभ

जळगाव जिल्ह्यात वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाला आर्थिक फायदा मिळाला लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त्य संस्थेअंतर्गत (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) द्वारा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील रहिवासी परंतु जळगाव शहरात आपला सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय (कॉस्मेटिक) या व्यवसायाची वाढ करण्यासाठी संजय लाधाराम राजपाल यांनी जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले व पूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे फुले मार्केट (शास्त्री टावर) या ठिकाणी वीरा ब्युटी पार्लर सेंटर सुरू केले आहे.

त्या अंतर्गत त्यांनी अमृत या स्वायत्त संस्थेच्या पोर्टलला ऑन लाईन वैयक्तिक व्याज परताव्यासाठी अर्ज केला होता त्या अंतर्गत त्यांना व्याजाचा तीन महिन्याचा व्याज परतावा १४,९३९ रुपयाचा पहिला हप्ता आज रोजी मिळाला यावेळी त्यांच्या शॉपला भेट दिली असता त्यांनी अमृत द्वारा व्याज परतावा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला त्यांनी त्यावेळी आपल्या मुलाखतीत शेवटी सिंधी समाजास आवाहन केले की सर्व सिंधी समाजाने अमृतच्या विविध योजनांचा व प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा अशी त्यांनी समाजास विनंती केली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 13-10-2026 News publication date | Time: 07:46 PM News publication time | Views: 106 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 13-10-2026 News publication date | Time: 07:46 PM News publication time | Views: 106 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement