सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील प्रसाद कुलकर्णी यांना मिळाला व्याज परतावा योजनेचा लाभ
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी प्रसाद कुलकर्णी यांना मिळाला आहे. ते ‘कृष्णाई टुर्स आणि ट्रॅव्हल्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन व प्रवास सेवा पुरवण्याचे काम करतात. स्वत:चा व्यवसाय सुरू करून तो यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेची माहिती मिळाल्यावर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगली जिल्हा कार्यालयात संपर्क करून कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केला. त्यांनी व्यवसायिक प्रवासी कार घेऊन त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आणि त्यांना व्याज परतावा मिळाल्याने मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
अशा योजनांमुळे स्वयंरोजगरला प्रोत्साहन मिळण्या सोबतच उद्योजकांना आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे विकसित करण्यासाठी मदत होते. अमृत सांगली जिल्हा कार्यालयाच्या वतीने पात्र युवक-युवतींनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी संपर्क :
९११२२२८७६६ /७०५७६०७४१९
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६
अमृत संस्थेविषयी :- अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ- https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment