बुलडाणा येथे अमृतच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाचे धडे

खामगाव, जि. बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने खामगाव येथे विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या कामकाजाची माहिती करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रेरणाही मिळाली.

बुलडाणा येथे अमृतच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाचे धडे मुख्य फोटो
बुलडाणा येथे अमृतच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाचे धडे अतिरिक्त फोटो

अमृतच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाचे धडे; MPSC-UPSC साठीही मिळाली प्रेरणा खामगाव, जि. बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने खामगाव येथे विद्यार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या कामकाजाची माहिती करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रेरणाही मिळाली.

या कार्यक्रमात खामगावचे तहसीलदार श्री. सुनील पाटील साहेब आणि नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा, शासकीय दाखले मिळविण्याची प्रक्रिया आणि प्रशासनाचे दैनंदिन कामकाज याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), उत्पन्नाचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे EWS प्रमाणपत्र, पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, सेतू विभाग आणि निवडणूक विभाग या विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संबंधित शासकीय सेवा मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्जप्रक्रिया आणि नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा, विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने अमृतच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

यावेळी तहसीलदार श्री. सुनील पाटील साहेब यांनी अमृतच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय कामकाजाची माहिती पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तहसीलदार साहेब आणि नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रेरित केले. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि लोकसेवेची भावना जोपासल्यास प्रशासकीय सेवेत यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी, जे. व्ही. मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, मेश्राम सर आणि ठाकूर मॅडम उपस्थित होते.

अमृतच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासन समजून घेण्याची, आपल्या हक्कांविषयी जागरूक होण्याची आणि भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळाली. शासनाच्या विविध सुविधा आणि योजनांची माहिती समाजातील पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने अमृतचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अमृतचा संकल्प — शासकीय योजनांची माहिती, युवकांना योग्य दिशा आणि सक्षम भविष्याची निर्मिती!


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 13-10-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 234 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 13-10-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 234 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement