अहिल्यानगर मधील प्रगत विद्यालय येथे अमृत सेवा संकल्प अभियान अंतर्गत "अमृत युवा ऊर्जा"कार्यक्रम संपन्न.ह. भ. प. राधेश्याम कुलकर्णी यांचे प्रभावी मार्गदर्शन.
अहिल्यानगर येथील प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "अमृत युवा ऊर्जा" हा युवकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला. यामध्ये एकूण १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मुख्याध्यापक मा. सुनील पंडित सर यांनी प्रमुख मार्गदर्शक मा. राधेश्याम कुलकर्णी, प्रमुख उपस्थितीतील नाशिक विभागीय व्यवस्थापक मा. मंगेश खाडिलकर व जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला.
मुख्याध्यापक मा. सुनील पंडित सर यांनी प्रास्ताविक करताना अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या योजनांविषयी माहिती दिली.
लोकतंत्र मिररचे जिल्हा प्रतिनिधी राधेश्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, नवीन पिढीतील 'Gen-Z' ने राष्ट्रहित जपण्यासाठी अध्ययन करावे, थोर पुरुष आणि समाजसुधारकांच्या महान कार्याचा अभिमान बाळगावा व त्यांची मूल्ये अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन केले. राधेश्याम कुलकर्णी यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत, हिंदू लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment