कवठे यमाई येथील ढाकी वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृतवर्ग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दुर्गोत्सव २०२६ याविषयी माहिती देण्यात आली. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुर्गोत्सव २०२६ विषयी मार्गदर्शन; खेळ, देशभक्तीपर गीते आणि बोधकथांमधून विद्यार्थ्यांवर संस्कार
कवठे यमाई येथील ढाकी वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृतवर्ग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दुर्गोत्सव २०२६ याविषयी माहिती देण्यात आली. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमृतवर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीते आणि प्रेरणादायी बोधकथा सांगून विद्यार्थ्यांना चांगले विचार, नैतिक मूल्ये आणि जीवनातील महत्त्वाचे धडे समजावून देण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका सौ. संगीता दुडे आणि सौ. योगिता साठे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात ज्ञान, मनोरंजन आणि संस्कार यांची सांगड घालणारा अनुभव मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment