सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभाग व जिल्हा कार्यालयात महिला आरोग्य मार्गदर्शन

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी राहावे आणि आनंदी जीवन जगावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने सोमवारी (१२ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयात ‘अमृत सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सव विशेष महिला आरोग्य मार्गदर्शन सत्र’ घेण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभाग व जिल्हा कार्यालयात महिला आरोग्य मार्गदर्शन मुख्य फोटो
सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभाग व जिल्हा कार्यालयात महिला आरोग्य मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर:- महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी राहावे आणि आनंदी जीवन जगावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत'च्या वतीने सोमवारी (१२ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयात ‘अमृत सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सव विशेष महिला आरोग्य मार्गदर्शन सत्र’ घेण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. सोनल कुलकर्णी यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, योग, ध्यान, योग मानसशास्त्र आणि योग्य आहार याबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील सर्वांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी सांगितले. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मन शांत ठेवण्यासाठी योग व ध्यान यांचे महत्त्वही त्यांनी समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी डॉ. सोनल कुलकर्णी यांचे स्वागत केले. यावेळी अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी उपस्थित महिलांना अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती दिली. या योजनांचा लाभ लक्षित गटातील नागरिकांना कसा घेता येईल, तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल, याबाबतही त्यांनी माहिती दिली.

महिलांना आरोग्याबाबत योग्य माहिती मिळावी, त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबासोबत स्वतःचे जीवनही आनंदी व निरोगी ठेवावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याला महत्त्व देत अमृतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि अमृत सखी ऋचा शर्मा उपस्थित होत्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 05:52 PM News publication time | Views: 181 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 05:52 PM News publication time | Views: 181 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement