छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणाची यशस्वी सांगता

अमृत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली. शेषगंगा इंटरप्रायझेसच्या माध्यमातून प्रशिक्षिका अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणाची यशस्वी सांगता मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणाची यशस्वी सांगता अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांचे आणि प्रशिक्षिका अंजली जोशी यांचे अमृत कार्यालयात स्वागत करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत सखी मंजू कुलकर्णी , रुचा शर्मा उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतः तयार केलेले फ्रॉक आणि बेबी किट यांची पाहणी करून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.

शेषगंगा इंटरप्रायझेस, आलोक नगर यांच्या माध्यमातून प्रशिक्षिका अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकूण १५ महिलांनी सहभाग घेतला. महिलांना शिलाई मशीनची ओळख, मशीन चालविणे, धागा व बॉबिन भरणे, सरळ शिलाईचा सराव, कपड्यांचे माप घेणे, कटिंग आणि मार्किंग यांसारखी कौशल्ये प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात आली. तसेच बेबी किट, फ्रॉक, परकर, स्कर्ट, ब्लाऊज आणि कुर्ती शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी स्वतः तयार केलेले फ्रॉक आणि बेबी किट सादर केले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अशा कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेता येतील, स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करता येईल आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालता येईल.

महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणारा अमृत संस्थेचा हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 05:25 PM News publication time | Views: 326 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 05:25 PM News publication time | Views: 326 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement