अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेत अशोक भुतडा यांना ८,८६३ रुपयांचा व्याज परतावा मिळाला. रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट देऊन जिल्हा टीमचे अभिनंदन केले. वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व्याज परताव्याचा लाभ मिळाल्याचे सांगत त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले.
छत्रपती संभाजीनगर : स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल, तर अनेकांना कर्ज घ्यावं लागतं. मात्र, कर्ज घेतल्यानंतर त्यावरील व्याज भरणं अनेक उद्योजकांसाठी मोठं आव्हान असतं. अशा वेळी महाराष्ट्र शासनाच्या अमृत स्वायत्त संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना लाभार्थ्यांसाठी मदतीचा हात ठरत आहे.
या योजनेचा लाभ अशोक भुतडा यांनाही मिळाला असून, त्यांच्या खात्यात एकूण ८,८६३ रुपयांचा व्याज परतावा जमा झाला आहे. व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी सांगितलं की, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची गरज असते. मात्र, कर्जावरील व्याजाचा भार कमी झाला, तर व्यवसाय करताना मोठा आधार मिळतो. अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे आर्थिक नियोजन करण्यास मदत होते. वेळोवेळी अमृतच्या जिल्हा टीमने मार्गदर्शन केल्यामुळे आज आपल्याला व्याज परताव्याचा लाभ मिळाला, असं त्यांनी सांगितलं.
व्याज परताव्याची रक्कम मिळाल्याबद्दल अशोक भुतडा यांनी अमृत संस्थेचे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमचे विशेष अभिनंदन करून आभार मानले. यावेळी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयातील टीमच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment