योजनांची माहिती देण्याचा प्रभावी उपक्रम असल्याची भावना व्यक्त
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर कार्यालयाच्या टीमने नागपूर महानगरपालिका मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये अमृत संस्थेचे नागपूर उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, तसेच अमृतमित्र निखिल देशपांडे यांचा समावेश होता. या वेळी महानगरपालिका मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाला अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमृत संस्थेची विशेष दिनदर्शिका उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली.
दिनदर्शिका पाहिल्यानंतर सर्वांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अमृतच्या सर्व योजना एका दिनदर्शिकेत सोप्या, सविस्तर व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने मांडण्याची संकल्पना अभिनव आणि उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment