अमृतच्या व्याज परतावा योजनेचा परभणी येथील तेजस चौधरी यांना लाभ

अमृत संस्थेच्या लक्षित गटातील पात्र नागरिकांनी विविध योजना व प्रशिक्षणांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे केले आवाहन .

अमृतच्या व्याज परतावा योजनेचा परभणी येथील तेजस चौधरी यांना लाभ मुख्य फोटो
अमृतच्या व्याज परतावा योजनेचा परभणी येथील तेजस चौधरी यांना लाभ अतिरिक्त फोटो

परभणी : अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ पाथरी येथील श्री. तेजस अतुल चौधरी यांना मिळाला आहे. त्यांनी ‘ऑर्ग्रॅनिक फार्म्स’ या व्यवसायासाठी वाहन कर्ज घेतले असून, या योजनेअंतर्गत त्यांना व्याज परताव्याचा लाभ प्राप्त झाला आहे. श्री. तेजस चौधरी हे स्वतःच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतांमध्ये उत्पादित होणारी ताजी फळे, भाज्या, विविध प्रकारची धान्ये आणि डाळी पुणे शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. शेतमालाचा नैसर्गिक दर्जा आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी ते कोणत्याही मध्यस्थाशिवाय स्वतःच्या मालकीच्या वाहनांद्वारे शेतमाल थेट पुण्यात पोहोचवतात. त्यांच्या या उपक्रमामुळे शेतमालाच्या थेट वितरणाला चालना मिळत असून, ग्राहकांना ताजा शेतमाल उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या व्यवसायासाठी घेतलेल्या वाहन कर्जावरील व्याज परताव्याचा लाभ मिळाल्याने श्री. चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. या लाभाबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे तसेच अमृतच्या परभणी जिल्हा टीमचे आभार मानले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 81 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 81 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement