मनमाड येथे भगवान अग्रसेन महाराजांची ५१५० वी जयंती उत्साहात साजरी.

भगवान अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अमृत’च्या विविध शासकीय योजनांची माहिती मिळून उद्योजकतेसाठी नवी दिशा मिळाली.

मनमाड येथे भगवान अग्रसेन महाराजांची ५१५० वी जयंती उत्साहात साजरी. मुख्य फोटो
मनमाड येथे भगवान अग्रसेन महाराजांची ५१५० वी जयंती उत्साहात साजरी. अतिरिक्त फोटो

मनमाड : भगवान अग्रसेन महाराज यांच्या ५१५० व्या जयंतीनिमित्त मनमाड येथे अग्रवाल समाजाच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला समाजबांधव, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेचे अमृतमित्र श्री. अजिंक्य कन्नल यांनी उपस्थितांना संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.यामध्ये शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP), व्याजपरतावा योजना तसेच ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ या उपक्रमांचा समावेश होता. तसेच संस्थेच्या आगामी कार्यक्रमांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी बोलताना श्री. कन्नल यांनी ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या EDP लाभार्थ्यांची तसेच व्याजपरतावा योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती दिली . मनमाड व परिसरातील अधिकाधिक युवकांनी अमृतच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग व व्यवसाय सुरू करावेत, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तरुणांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, हा अमृत संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.या मेळाव्यास अग्रवाल समाजाचे अध्यक्ष श्री. रमेशजी अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर कुडाळ यांच्यासह समाजातील मान्यवर, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. भगवान अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना शासकीय योजनांची माहिती मिळून उद्योजकतेसाठी नवी दिशा मिळाली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया,बंगाली,त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत, व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहेत . संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 11:00 AM News publication time | Views: 394 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 12-10-2026 News publication date | Time: 11:00 AM News publication time | Views: 394 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement