दधिच राज्य संघटनेचे महासचिव महेश तिवारी यांचे मत
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने दधिच राज्य संघटनेचे महासचिव आणि प्रमुख महेश तिवारी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. अमृत संस्थेतर्फे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, तसेच अमृतसखी दर्शना जाब्रस उपस्थित होत्या. या वेळी श्री. तिवारी यांना अमृत संस्थेची विशेष दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली.
दिनदर्शिका पाहिल्यानंतर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अमृतच्या सर्व योजना एका दिनदर्शिकेत सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मांडण्याची संकल्पना अभिनव व उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ही अमृत दिनदर्शिका संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, सध्या तिचे वितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. या दिनदर्शिकेमुळे सामान्य नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजना समजून घेणे अधिक सोपे होणार असून, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment