श्रीकांत शेगदार यांना अमृत योजनेतून ८७,९३२ रुपयांचा व्याज परतावा

कळंब येथील श्री समर्थ झेरॉक्सच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ; अमृतच्या माध्यमातून योजनेचा लाभ

श्रीकांत शेगदार यांना अमृत योजनेतून ८७,९३२ रुपयांचा व्याज परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

कळंब, प्रतिनिधी : कळंब येथील श्री समर्थ झेरॉक्सचे मालक श्री. श्रीकांत शिवाजी शेगदार यांना अमृत योजनेअंतर्गत ८७,९३२ रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळाल्याने शेगदार यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

अमृत योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य तसेच कर्जावरील व्याज परताव्याचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेत श्री. शेगदार यांनी आपल्या व्यवसायाला आर्थिक बळकटी दिली आहे.

या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चिन्मय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. तसेच अमृत मित्र श्री. रवी वैद्य यांनी यासाठी सहकार्य केले.

अमृतच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि उपलब्ध शासकीय योजनांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला आर्थिक बळकटी द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 11-10-2026 News publication date | Time: 09:00 AM News publication time | Views: 402 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 11-10-2026 News publication date | Time: 09:00 AM News publication time | Views: 402 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement