प्रौढ मतिमंदांना आत्मनिर्भर बनवण्याचे संज्ञा चैतन्य सोसायटीचे कार्य प्रेरक

अमृत संस्थेच्या नागपूर टीमने भेट देऊन केली चर्चा

प्रौढ मतिमंदांना आत्मनिर्भर बनवण्याचे संज्ञा चैतन्य सोसायटीचे कार्य प्रेरक मुख्य फोटो
प्रौढ मतिमंदांना आत्मनिर्भर बनवण्याचे संज्ञा चैतन्य सोसायटीचे कार्य प्रेरक अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयाच्या टीमने नुकतीच संज्ञा चैतन्य सोसायटीला सदिच्छा भेट दिली. ही संस्था प्रौढ मतिमंद व्यक्तींसाठी निवासी प्रकल्प व संरक्षित कार्यशाळा चालवते. या भेटीमध्ये अमृत टीमने संज्ञा चैतन्य सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत संस्थेची कार्यपद्धती, चालू उपक्रम, तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांबाबत अमृत टीमला सखोल माहिती मिळाली. प्रौढ मतिमंद व्यक्तींना सुरक्षित, संरक्षित आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देत त्यांना समाजात आत्मनिर्भर बनविणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी संज्ञा चैतन्य सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “संज्ञा चैतन्य सोसायटीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ते प्रेरणादायी आहे. अशा संस्थांच्या उद्दिष्टांना अमृत संस्थेतर्फे सहकार्य करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या भेटीमुळे दोन्ही संस्थांमधील समन्वय अधिक दृढ होऊन भविष्यात प्रौढ मतिमंद व्यक्तींसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 04:27 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 04:27 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words