छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयात अमृतच्या उपक्रमांची माहिती; दुर्गोत्सव २०२६ शाळेत राबविणार

छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता भाले आणि उपमुख्याध्यापक नागेश जोशी यांची भेट घेऊन अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली. यावेळी अमृत शासन युवा संवाद, अमृत युवा ऊर्जा आणि अमृत दुर्गोत्सव २०२६ या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच ओंकार विद्यालय आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत अमृत दुर्गोत्सव २०२६ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयात अमृतच्या उपक्रमांची माहिती; दुर्गोत्सव २०२६ शाळेत राबविणार मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयात अमृतच्या उपक्रमांची माहिती; दुर्गोत्सव २०२६ शाळेत राबविणार अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयाला भेट देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता भाले आणि उपमुख्याध्यापक नागेश जोशी यांची भेट घेऊन अमृतच्या कामाची माहिती देण्यात आली. तसेच अमृत शासन युवा संवाद, अमृत युवा ऊर्जा, अमृत दुर्गोत्सव २०२६ आणि इतर उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी ओंकार विद्यालय आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत अमृत दुर्गोत्सव २०२६ हा उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असून, अमृतचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 02:49 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 02:49 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement