अमृतच्या योजना आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी प्राचार्य राजेश धानोरकर यांची छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट

छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला सरदार वल्लभभाई पटेल औद्योगिक शिक्षण संस्था, कन्नड आणि स्व. रंगनाथ वाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैजापूरचे प्राचार्य राजेश धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण, अमृत युवा ऊर्जा, अमृत शासन युवा संवाद, दुर्गोत्सव २०२६ आणि इतर उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. अमृत जिल्हा टीमच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अमृतच्या योजना आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी प्राचार्य राजेश धानोरकर यांची  छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट मुख्य फोटो
अमृतच्या योजना आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी प्राचार्य राजेश धानोरकर यांची  छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला सरदार वल्लभभाई पटेल औद्योगिक शिक्षण संस्था, कन्नड आणि स्व. रंगनाथ वाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैजापूर येथील प्राचार्य राजेश धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून लक्षित गटातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी अमृत युवा ऊर्जा, अमृत शासन युवा संवाद, दुर्गोत्सव २०२६ तसेच अमृतच्या माध्यमातून सुरू असलेल्या इतर उपक्रमांची माहितीही त्यांना देण्यात आली. अमृतच्या माध्यमातून तरुणांना आणि लक्षित गटातील नागरिकांना पुढे जाण्यासाठी कशा प्रकारे संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी अमृत जिल्हा टीमच्या वतीने प्राचार्य राजेश धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement