यवतमाळ येथे तीन ठिकाणी अमृतवर्ग प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून देशोपयोगी व संस्कारक्षम नवीन पिढी घडविण्यासाठी कैलासजी कुरकुटे यांचे मार्गदर्शन

यवतमाळ येथे तीन ठिकाणी अमृतवर्ग प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न  मुख्य फोटो
यवतमाळ येथे तीन ठिकाणी अमृतवर्ग प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न  अतिरिक्त फोटो

यवतमाळ येथे दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी अमृतच्या वतीने यवतमाळ शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अमृतवर्ग प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस अमृतवर्गाचे मुख्य प्रशिक्षक तथा महाराष्ट्र प्रभारी श्री. कैलासजी कुरकुटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यशाळा घेण्यात आल्या.

सकाळी ७ ते ९ या वेळेत लोकनायक बापूजी आणि विद्यालय येथे, त्यानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत स्व. रामाजी चरणावर विद्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेदरम्यान अमृतवर्गाचे महत्त्व, अमृतवर्ग घेण्याची प्रभावी पद्धत, वर्गाचा मुख्य उद्देश आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये अमृतवर्गाची भूमिका याविषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल, त्यांच्यातील सुप्त गुणांना कशी चालना देता येईल आणि अमृतवर्गाच्या माध्यमातून देशासाठी उपयुक्त, सुसंस्कारित व जबाबदार नागरिक कसे घडविता येतील, याबाबत कैलासजी कुरकुटे सर यांनी मार्गदर्शन केले.

नवीन पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी अमृतवर्ग महत्त्वपूर्ण

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार, उत्तम संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. अमृतवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवून त्यांना समाज व राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणारे नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला जातो. या उद्देशाने प्रशिक्षकांनी अमृतवर्ग प्रभावीपणे राबवावा, असे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.

या कार्यशाळेला अमृत जिल्हा कार्यालयाची टीम, भंडारा जिल्हा व्यवस्थापक श्री. ओंकार हरदास, यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षित शर्मा तसेच जिल्हा उपव्यवस्थापक श्री. कामेश राखे उपस्थित होते.

शैक्षणिक संस्थांमधील प्रशिक्षकांना अमृतवर्गाची संकल्पना समजावून देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सक्षम करणे, हा या प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 10:08 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 10:08 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement