महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत संवाद सेतू उपक्रमांतर्गत दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत संवाद सेतू उपक्रमांतर्गत दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाची, प्रशासकीय यंत्रणेची तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. यावेळी आदित्य शेंडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशासकीय कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेण्यास मदत झाली. शासनाच्या कार्यपद्धतीची माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय जाणीव निर्माण करणे आणि शासकीय यंत्रणा व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे हा अमृत संवाद सेतू उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासोबतच लोकाभिमुख प्रशासन, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. आदित्य शेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रशासकीय क्षेत्रातील कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि आव्हाने यांविषयी नवी दृष्टी मिळाली. अमृत संवाद सेतू हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा, त्यांच्यात प्रशासकीय जाणीव निर्माण करणारा आणि भावी काळात जबाबदार नागरिक व सक्षम अधिकारी घडविण्यास प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : राणी झाशी चौक, चापमनवाडी, आठवडी बाजार, ज्ञानेश्वर मंदिर रोड, यवतमाळ, ४४५००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment