छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबनाची संधी

अमृतच्या वतीने आयोजित १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाला अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेले फ्रॉक आणि बेबी किट यांची पाहणी करण्यात आली. शेषगंगा इंटरप्रायझेसच्या माध्यमातून अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रशिक्षणात १५ महिला सहभागी झाल्या आहेत

छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबनाची संधी मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथे शिलाई प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबनाची संधी अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाला अमृत सखी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेले फ्रॉक आणि बेबी किट यांची पाहणी करून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी एकूण १५ महिलांनी सहभाग नोंदवला आहे. शेषगंगा इंटरप्रायझेस, आलोक नगर यांच्या माध्यमातून अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रशिक्षणामध्ये महिलांना शिलाई मशीनची ओळख, मशीन चालविणे, धागा व बॉबिन भरणे, सरळ शिलाईचा सराव, कपड्यांचे माप घेणे, कटिंग आणि मार्किंग यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच बेबी किट, परकर, स्कर्ट, फ्रॉक, ब्लाऊज आणि कुर्ती शिवण्याचे कौशल्य शिकविण्यात येत आहे. यासोबतच मार्केटिंग, बिलिंग आणि तयार केलेल्या वस्तूंची विक्री कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधून प्रशिक्षणातून मिळणाऱ्या कौशल्यांचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी प्रशिक्षणादरम्यान स्वतः तयार केलेले फ्रॉक आणि बेबी किट पाहून त्यांच्या कामाची प्रगती जाणून घेतली.

या शिलाई प्रशिक्षणामुळे महिलांना शिवणकामाचे कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण करता येणार आहेत. तसेच स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळविणे, कुटुंबाला हातभार लावणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे शक्य होणार आहे. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहित करण्याचा अमृत संस्थेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 12:40 PM News publication time | Views: 136 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 12:40 PM News publication time | Views: 136 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement