परभणी येथे अमृत वर्गातून विद्यार्थ्यांना मिळाले शिस्त, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचे धडे

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ‘अमृत’चा स्तुत्य उपक्रम

परभणी येथे  अमृत वर्गातून विद्यार्थ्यांना मिळाले शिस्त, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचे धडे मुख्य फोटो
परभणी येथे  अमृत वर्गातून विद्यार्थ्यांना मिळाले शिस्त, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचे धडे अतिरिक्त फोटो

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने ब्राह्मणगाव येथील छत्रपती संभाजी विद्यालयात अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गात विद्यार्थ्यांसाठी विविध शारीरिक व बौद्धिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांत विद्यार्थ्यांकडून व्यायाम, राष्ट्रभक्तीपर व प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची विचारक्षमता, एकाग्रता आणि आकलनशक्ती वाढविण्यासाठी बौद्धिक खेळ घेण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यावर भर देण्यात आला. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी आणि अमृत मित्र अनंत जोगदंड उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anant Jogdand News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 07:38 PM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anant Jogdand News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 07:38 PM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement