श्री रामजी देवस्थान रामनाथ,अलिबाग येथे“अमृत वर्ग चित्रकला स्पर्धा” संपन्न

अमृत संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळाली. चित्रकला स्पर्धामुळे मुलांचा कलगुणाना वाव मिळतो. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री रामजी देवस्थान रामनाथ,अलिबाग येथे“अमृत वर्ग चित्रकला स्पर्धा” संपन्न मुख्य फोटो
श्री रामजी देवस्थान रामनाथ,अलिबाग येथे“अमृत वर्ग चित्रकला स्पर्धा” संपन्न अतिरिक्त फोटो

“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने “श्रीराम जी देवस्थान रामनाथ” अलिबाग येथे “अमृतवर्ग चित्रकला स्पर्धांचे” आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मोबाईल फोनपासून दूर ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच त्यांच्यात अभ्यास, शिस्त आणि सकारात्मक विचारांची गोडी निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या विशेष उपक्रमासाठी ट्रस्टी श्री मुकेश भाई, श्री महेंद्र साठे तसेच परीक्षक श्रीमती अनुजा सामंत तसेच मंगलेश महेता यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चित्रकला स्पर्धेचे महत्त्व, त्याचे उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्याचा होणारा उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देण्याचा संदेश देण्यात आला.

चित्रकल स्पर्धेसाठी माझी शाळा, शाळेत खेळणारी मुले, माझी वसुंधरा,भारत माता, आपल अमृतवर्ग आसे विषय देण्यात आले होते.

चित्रकला स्पर्धे मध्ये ६५ मुलांनी भाग घेतला होता.जिल्हा व्यवस्थापक श्री शैलेश मराठे, उपव्यवस्थापक कु.मंगेश ढेबे,अमृतसखी जान्हवी साठे स्पर्धेसाठी उपस्थित होते तसेच अमृत वर्ग स्वयंसेविका कु.स्वरांगी मराठे, कु. सवनी मराठे,यांनी चांगले सहकार्य केले. अमृत संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळाली. चित्रकला स्पर्धामुळे मुलांचा कलगुणाना वाव मिळतो. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 07:07 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 07:07 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement