सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगावात अमृत मार्फत नेत्र तपासणी शिबिर.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून करिअरच्या वाटचालीत मनापासून प्रयत्न करावे : मिलिंद पाटील

सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगावात अमृत मार्फत नेत्र तपासणी शिबिर. मुख्य फोटो
सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगावात अमृत मार्फत नेत्र तपासणी शिबिर. अतिरिक्त फोटो

मालेगाव : करिअरच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून करिअरच्या वाटचालीसाठी मनापासून प्रयत्न करावेत. तसेच यशस्वी व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपले ध्येय निश्चित करावे, असे मार्गदर्शन महाराष्ट्र कामागार कल्याण मंडळाचे केंद्रसंचालक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव येथे अमृत मार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य प्रकाश जैन, अमृत चे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता, दीया आय केअर, मालेगाव डॉ. अभिजित निकम, गट निदेशक धवल गरूड, अमृतमित्र अजिंक्य कन्नल, शिरिष गुरूबे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. अमृत मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर मार्गदर्शनासोबतच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी करिअर गाईडन्स उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वैयक्तिक, कौटुंबिक अथवा मानसिक अडचणींवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अमृत व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक श्री. गुप्ता यांनी दिली.यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच डोळ्यांचे आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 93 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 93 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement