मालेगाव येथे महिला महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

मालेगाव येथे महिला महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न मुख्य फोटो
मालेगाव येथे महिला महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

मालेगाव कॅम्प:- येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पलताई हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग आणि 'अमृत' (Academy of Maharashtra Research, Upliftment & Training - AMRUT) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. अक्षदा कुलकर्णी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, "आजच्या काळात नैराश्याचे (डिप्रेशन) प्रमाण वाढत चालले असून, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यातील कमी होत चाललेला संवाद आहे.

प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे आणि आपल्याकडून कोणतेही चुकीचे पाऊल पडणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे." पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, "महिला ही दुर्गेचे रूप मानली गेली आहे. आपल्याला समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा लाभला असून, जिजाऊंनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, तसेच संस्कार आजच्या पिढीवर होणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी स्वतःमधील कलागुणांना वाव देत स्वसंरक्षणासाठीही सदैव सक्षम राहिले पाहिजे.

यावेळी अमृतचे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता यांनी उपस्थित विद्यार्थिनींना 'अमृत मानस मित्र' उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज होत्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. के. बोरसे मॅडम, मानसशास्त्र विभागाच्या प्रा. रोहिणी पवार, अमृतचे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता तसेच अमृत मालेगावचे प्रतिनिधी अजिंक्य कन्नल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 06:02 PM News publication time | Views: 351 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 06:02 PM News publication time | Views: 351 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement