अमृत संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची मिळाली शिकवण.
“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा “अमृत वर्ग” उपक्रम रायगड जिल्ह्यातील नागाव गावातील संचालक मंडळ नगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी “अमृत वर्गाचे” आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थ्यांना मोबाईल फोनपासून दूर ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच त्यांच्यात अभ्यास, शिस्त आणि सकारात्मक विचारांची गोडी निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या विशेष उपक्रमासाठी पालघर येथून श्री. कैलास कुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमृत वर्गाचे महत्त्व, त्याचे उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्याचा होणारा उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देण्याचा संदेश देण्यात आला.
अमृत संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी “अमृत वर्गाची” संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतल्या शिक्षकानी या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. शालेय मुलांना थोड्यावेळासाठी का होईन मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांची एकाग्रता वढवण्यासाठी, त्यांना योग्य संस्कार होण्यासाठी उत्तम नेतृत्व घडवण्यासाठी अमृत वर्ग प्रभावी माध्यम ठरत असल्याचे शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले.
अमृतवर्ग घेताना कैलासजी मुरकुटे सरानबरोबर रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री शैलेश मराठे व उपव्यवस्थापक मंगेश ढेबे शाळेत उपस्थित होते. संचालक मंडळातील सौ स्नेह जोशी बाईं, कार्याध्यक्ष श्रीमती मंदा आठवले बाई, अध्यक्ष श्री मंगेश आठवले सर, सदस्य श्री संदीप ढापरे सर मुख्याध्यापक श्री अजित पाटील सर आदि मंडळींच मोलाचे सहकार्य लाभले.
आधिक माहिती साठी संपर्क :- www.mahaamrut.org.in रायगड जिल्हा व्यवस्थापक ९११२२२८७५९ श्री शैलेश मराठे ९४२३८९२१८२ कु मंगेश ढेबे ८१४९५५२१४३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment