अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दुर्गोत्सव 2026 या उपक्रमाची सुरुवात पुणे विभागामध्ये कोल्हापुरातून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी मा. डॉ. विजय राठोड यांची भेट पुणे विभागीय अधिकारी मा. प्रथमेश कुलकर्णी व कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी घेतली.
अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संतेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दुर्गोत्सव 2026 या उपक्रमाची सुरुवात पुणे विभागामध्ये कोल्हापुरातून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी मा. डॉ. विजय राठोड यांची भेट पुणे विभागीय अधिकारी मा. प्रथमेश कुलकर्णी व कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी घेतली. दुर्गोत्सव 2026 हा उपक्रम महाराष्ट्रभर साजरा होणार आहे तरी या उपक्रमात कोल्हापूर वासियांचा सर्वात जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा या उद्देशाने जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यात आली.
मागच्या वर्षी देखील कोल्हापूर वासियांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला होता यासाठी बहुमोल योगदान कलेक्टर साहेबांचा कोल्हापूरकरांना अपील करणारा व्हिडिओ बाईट च्या माध्यमातून लाभले होते. याची देखील आठवण यानिमित्ताने झाली. अशाच प्रकारचे योगदान यावेळी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळावे यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यात आली.
सर्व शाळा, कॉलेज व सामाजिक संस्था, दुर्ग बनवणारी मंडळं अशा विविध स्तरावर याविषयीची माहिती आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून पोचवून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी विनंती करण्यात आली.
तसेच विभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी साहेबांना संवाद सेतू उपक्रमाबद्दल देखील माहिती देऊन या उपक्रमात देखील आपण अमृतला सहकार्य करावे अशी विनंती केली व सर्व प्रकारचे शासकीय दाखले काढण्याचे शिबिर देखील आयोजित करण्यात यावे असे सुचवण्यात आले.
यामुळे समाजातील तळागाळातील अमृतच्या लक्षित गटापर्यंत अमृतच्या योजना पोचवण्यासाठी अमृतला सहकार्य मिळेल व सर्वसामान्यांना योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारचे मत विभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या सोबतच्या झालेल्या चर्चेमधून मांडले.
यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील बोलताना सर्व प्रकारचे सहकार्य अमृत संस्थेला आमच्या कार्यालयाकडून मिळेल असे मत व्यक्त केले.
एकंदरीत विभागीय अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना घेतलेल्या या भेटीमुळे कोल्हापूर मध्ये अमृत संस्थेच्या योजना व उपक्रम सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन या भेटीमधून निर्माण झाला आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment