महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि कौशल्याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मेहंदी प्रशिक्षण कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यात प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे .
महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या दिशेने अमृत संस्थेचे महत्त्वपूर्ण पाऊल! फलटण येथे महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) संस्थेच्या वतीने महिलांसाठी मेहंदी प्रशिक्षण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि EDP (उद्योजकता विकास प्रशिक्षण) आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमातून महिलांना मेहंदी कलेचे कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढविणे, संवादकौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे.
केवळ प्रशिक्षण नव्हे, तर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने अमृत संस्था प्रयत्नशील आहे.
अमृतचा संकल्प — कौशल्य विकासातून स्वावलंबन, स्वावलंबनातून महिला सक्षमीकरण!
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment