अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत चंद्रपुरातील श्री. गजानन बोमकंटीवार यांना गृहउद्योग व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजापोटी ७४ हजार ८७५ रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या गृहउद्योग व्यवसायाला आधार मिळाला आहे.
व्याज परतावा योजनेतून आर्थिक दिलासा
स्वतःचा व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसायाचा विस्तार करताना अनेकांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी अमृतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाची परतावा रक्कम मिळत असल्याने व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक नियोजन करण्यास मदत होते.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील लक्षित गटातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हा अमृतच्या विविध योजनांचा प्रमुख उद्देश आहे.
योजनेच्या लाभाबद्दल बोमकंटीवार यांनी आभार मानले
श्री. गजानन बोमकंटीवार यांनी अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यामुळे लाभ मिळवणे सुलभ झाले, असे सांगत त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले.
पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा
अमृतच्या विविध योजनांच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगार, गृहउद्योग आणि व्यवसायवृद्धीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशा योजनांमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होते आणि लाभार्थ्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी आधार मिळतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती घ्यावी, पात्रतेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क - ९११२२२८७७४
अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता - गुरुद्वारा रोड, कृष्णा टावर जवळ, तुकूम चंद्रपूर
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment