कावलगावच्या सुहास कोटगिरे यांच्या व्यवसाय विस्ताराला आर्थिक आधार; वाढत्या खर्चाचा ताण झाला कमी
परभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील तरुण व्यावसायिक सुहास कोटगिरे यांना अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या किराणा व्यवसायाला या योजनेमुळे आर्थिक बळ मिळून व्यवसायवृद्धीस हातभार लागला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुहास कोटगिरे यांनी अमृत संस्थेचे व परभणी अमृत टीमचे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. लाभार्थ्यांना योग्य माहिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लक्षित गटातील पात्र युवक-युवती, लघु उद्योजक, महिला व नागरिकांनी या अमृत संस्थेच्या विविध योजना व प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Shilpa Malewar
Can schourship for my son iiit nagpur in aicse in collage I get scholarship in ews catagory please send me
Write a Comment