: राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तसेच महाराष्ट्र युवा धोरण समितीच्या समिती सदस्य विधी पळसापुरे यांची लातूर जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट

राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तसेच महाराष्ट्र युवा धोरण समितीच्या समिती सदस्य विधी पळसापुरे यांनी लातूर येथील जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

: राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तसेच महाराष्ट्र युवा धोरण समितीच्या समिती सदस्य विधी पळसापुरे यांची लातूर जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तसेच महाराष्ट्र युवा धोरण समितीच्या समिती सदस्य विधी पळसापुरे यांनी लातूर येथील जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, योजना आणि कार्यक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच युवकांच्या कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

युवकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या क्षमता व कौशल्यांना योग्य दिशा देण्यासाठी विविध स्तरांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या भेटीमुळे लातूर जिल्ह्यातील युवकांसाठी भविष्यातील उपक्रम व संधींबाबत सकारात्मक संवाद घडून आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 08-10-2026 News publication date | Time: 06:21 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 08-10-2026 News publication date | Time: 06:21 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement