आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, हिंगोली यांच्या वतीने EDP प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचा शुभारंभ दि. ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आला आहे.
हिंगोली, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, हिंगोली जिल्हा कार्यालय यांच्या वतीने Entrepreneurship Development Programme (EDP) प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर दि. ०९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १० दिवसीय EDP प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. युवक-युवतींमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे, व्यवसायाच्या संधी ओळखण्याची क्षमता निर्माण करणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना व्यवसायाची संकल्पना व निवड, व्यवसाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहक व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्थिक नियोजन, व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजना व कर्ज सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या विविध अडचणी, त्यावरील उपाय आणि व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक नियोजन याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. EDP प्रशिक्षण हे केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता प्रशिक्षणार्थींना व्यवसायाची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना आपल्या व्यवसायासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करण्यास तसेच उपलब्ध संसाधने, बाजारपेठ आणि विविध शासकीय योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हिंगोली जिल्ह्यात युवक-युवतींना पारंपरिक रोजगाराच्या संधींसोबतच स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वळविणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भविष्यात रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविणे, या उद्देशाने अमृतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून EDP प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. “प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून आर्थिक स्वावलंबन” या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतींना उद्योजकतेची नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या पुढाकाराने आयोजित या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी संबंधित प्रशिक्षक, समन्वयक व कार्यालयीन कर्मचारी प्रयत्नशील आहेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींमध्ये उद्योजकतेचा आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी निश्चितच नवी प्रेरणा मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment