सेवा सप्ताहानिमित्त मालेगावातील मुलांच्या निरीक्षण गृहात नेत्र तपासणी शिबिर

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा सप्ताहानिमित्त मालेगावातील मुलांच्या निरीक्षण गृहात नेत्र तपासणी शिबिर मुख्य फोटो
सेवा सप्ताहानिमित्त मालेगावातील मुलांच्या निरीक्षण गृहात नेत्र तपासणी शिबिर अतिरिक्त फोटो

मालेगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्था आणि कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताहानिमित्त मुलांचे निरीक्षण गृह, मालेगाव येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात निरीक्षण गृहातील २४ मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली. मुलांच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्या दृष्टीसंदर्भातील अडचणींची माहिती घेण्यात आली. नियमित नेत्र तपासणी, डोळ्यांची योग्य काळजी आणि आरोग्यविषयक सवयी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा अमृत संस्था व कामगार कल्याण मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. बालकांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यातील अनेक दृष्टीविषयक समस्या टाळता येऊ शकतात, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिर यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख मिलिंद पाटील, मुलांचे बालगृह व निरीक्षण गृहाचे अधीक्षक प्रविण पवार, अमृत संस्थेचे जिल्हा समन्वयक दिपक गुप्ता, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र सेवक रविंद्र पाटील, अमृत मित्र अजिंक्य कन्नल, शिक्षिका प्राजक्ता निकम, क्लर्क श्याम बच्छाव तसेच समुपदेशक एस. के. कन्नोर यांनी विशेष सहकार्य केले.सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून “सेवा हीच सामाजिक बांधिलकी” या भावनेचा प्रत्यय आला. बालकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणारा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 08-10-2026 News publication date | Time: 04:26 PM News publication time | Views: 321 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Deepak Gupta News publisher name | Date: 08-10-2026 News publication date | Time: 04:26 PM News publication time | Views: 321 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement