'लेटर ऑफ इंटेंट' प्रदान
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील रहिवासी भूषण जोशी यांना अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळणार आहे. संस्थेतर्फे त्यांना एक जानेवारी २०२६ रोजी लेटर ऑफ इंटेंट (LOI) प्रदान करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे.
भूषण जोशी यांनी घेतलेल्या व्यावसायिक कर्जावर आकारले जाणारे १२ टक्के दरापर्यंतचे व्याज पुढील दोन वर्षांच्या कालावधीत अमृत संस्थेमार्फत दर तीन महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही मदत त्यांच्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या श्री. जोशी यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅश क्रेडिट प्रकारचे कर्ज सुरू असून, त्यावर अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेअंतर्गत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेमुळे उद्योजकांना व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी मोठा आधार मिळत आहे.
जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर यांच्या हस्ते लेटर ऑफ इंटेंट श्री. जोशी यांना प्रदान करण्यात आले. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळत असून, रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतच्या संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
ऋषीकेश कथलकर - 7249451152
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment