एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रमांतर्गत दत्त मंदिर परिसर स्वच्छता
हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या वतीने ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमांतर्गत हिंगोली शहरातील दत्त मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दत्त मंदिर परिसर, परिसरातील मार्ग तसेच आजूबाजूच्या भागाची स्वच्छता करण्यात आली. परिसरात पडलेला कचरा संकलित करून परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला. ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या संकल्पनेतून नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे व परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, कौशल्यविकास व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ हा उपक्रमही त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांनी व नागरिकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छ, सुंदर व जबाबदार समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. दत्त मंदिर परिसरातील स्वच्छता मोहिमेमुळे परिसराला स्वच्छ व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले. ‘स्वच्छता हीच सेवा आणि राष्ट्रसेवा हीच जबाबदारी’ या भावनेतून अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment