हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या वतीने शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीचा संदेश देत वृक्षांच्या संगोपनाचे आवाहन करण्यात आले.
हिंगोली, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या वतीने शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शेतकरी भवन परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरणपूरक आणि हरित हिंगोली निर्मितीचा संदेश देण्यात आला. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment