केंदूर येथील पाचवड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत वर्ग’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दुर्गोत्सव २०२६ संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
केंदूर येथील पाचवड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत वर्ग’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दुर्गोत्सव २०२६ संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी युनेस्कोच्या मान्यताप्राप्त दुर्गांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे महत्त्व, त्यांचा इतिहास आणि संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दुर्गोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल जिज्ञासा आणि अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिवाळीच्या कालावधीत दुर्गोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाची माहिती देताना, विद्यार्थ्यांनी यातील एका ऐतिहासिक दुर्गाची प्रतिकृती तयार करून दुर्गोत्सवात सहभाग नोंदवावा, याबाबतची संकल्पना आणि सहभागाची पार्श्वभूमी शिक्षक व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
यानंतर अमृत वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी योगासने, विविध खेळ, देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीपर घोषणा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे अमृत वर्गाला शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि देशभक्तीपर उपक्रमांची सुंदर जोड मिळाली.
या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री. संतोष तांबे गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा, संस्कार, आरोग्य, खेळ आणि देशभक्ती यांचा समन्वय साधणारा प्रेरणादायी अनुभव मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment