अमृतच्या माध्यमातून लक्षित गटातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण आणि उपक्रमांची माहिती समाजातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजयभाई शहा यांची भेट घेण्यात आली. यावेळी अमृतच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून लक्षित गटातील नागरिकांसाठी विविध योजना, प्रशिक्षण आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी विविध समाजातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जनजागृती करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आज अजयभाई शहा यांची भेट घेण्यात आली. अजयभाई शहा हे CAT चे महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष, एस.बी. कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्र गुजराती समाजाचे उपाध्यक्ष आहेत.
यावेळी अमृतच्या माध्यमातून लक्षित गटासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, व्यवसायासाठी मदत, प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकतेच्या संधी तसेच अमृतच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश मेहता हे देखील उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment