अलिबाग अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ “अलिबाग शहरात ” यशस्वीरित्या संपन्न......

“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील हॉटेल व्हेव्ज बॅक्वेट हॉल ,टिळक रोड अलिबाग येथे” यशस्वी रित्या संपन्न झाला .

अलिबाग अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ “अलिबाग शहरात ” यशस्वीरित्या संपन्न...... मुख्य फोटो
अलिबाग अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ “अलिबाग शहरात ” यशस्वीरित्या संपन्न...... अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील हॉटेल व्हेव्ज बॅक्वेट हॉल, टिळक रोड, अलिबाग येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

महाराष्ट्र शासनाची "अमृत" ही स्वायत्त संस्था असून तिच्यामार्फत इतर मागासवर्गीय बहुजन विकास कल्याणांतर्गत आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध व्यवसायोत्तेजक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. नव्याने तयार होणाऱ्या लघु उद्योजकांच्या वस्तूंना विशेष प्रदर्शनासाठी चांगला मंच मिळावा आणि त्यांच्या मालाचा भरपूर खप होण्यासाठी चांगल्या बाजारपेठा मिळाव्यात तसेच जगात सर्वत्र त्यांचे उद्योगव्यवसाय पोहोचावेत, हा अमृतपेठचा मूळ उद्देश आहे. तसेच शासनाच्या अनेक योजनांचा तसेच अनेक प्रशिक्षणांचा त्यांना कसा लाभ घेता येईल, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

अमृतपेठ कार्यक्रमान्तर्गत अमृत संस्थेने दिनांक २, ३, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी “अमृतपेठ थेट बाजारपेठ” चे हॉटेल व्हेव्ज बॅक्वेट हॉल, टिळक रोड, अलिबाग, जि. रायगड येथे आयोजन केले होते. सदर बाजारपेठ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली होती.

अमृत पेठेच्या उद्घाटनासाठी मा. श्री. संतोषजी सुतार, संघचालक (कोलाबा जिल्हा), तसेच एड. अंकित बंगेरा, नगरसेवक, अलिबाग नगरपरिषद, एड. सौ. वैशाली अंकित बंगेरा, तसेच अविनाश धाट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री. दयानंद खरात, सामाजिक कार्यकर्ते, तसेच वात्सल्य ट्रस्टच्या प्रकल्प अधिकारी सौ. शोभा जोशी उपस्थित होते.

अलिबाग शहर व उपनगरातील अनेक मान्यवरांनी तसेच नागरिकांनी उस्फूर्तपणे अमृत पेठेत मित्र परिवारासह येऊन खरेदीचा आनंद लुटला.

अमृतपेठ मध्ये स्टॉल धारकांनी घरगुती खाद्यपदार्थ, नवरात्रीच्या दृष्टीने तोरणे, इमिटेशन ज्वेलरी, दिवे, पणत्या, ड्रेस मटेरियल, विविध प्रकारच्या साड्या, धार्मिक वस्तू, अनेक प्रकारची घरगुती पिठे, पर्सेस असे अनेकविध स्टॉल लावले होते.

कार्यक्रमानंतर स्टॉल धारक खूप समाधानी होते की त्यांनी आणलेल्या सर्व वस्तू अपेक्षेप्रमाणे विकल्या गेल्या. हेच अलिबाग अमृत पेठेचे यश म्हणता येईल, असे अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश मराठे व उपव्यवस्थापक कु. मंगेश ढेबे यांनी सांगितले. या कामी अमृत सखी जान्हवी साठे, सौ. पल्लवी मंदार जोशी, श्री. महेंद्र साठे, सौ. दीक्षा कारूळकर, कु. विक्रम मंदार जोशी, एड. अंकित बंगेरा, एड. सौ. वैशाली अंकित बंगेरा, श्री. मानस कुंटे, यांची खूप मोलाची मदत झाली.

आधिक माहिती साठी संपर्क :- www,mahaamrut.org.in रायगड जिल्हा व्यवस्थापक- ९११२२२८७५९ श्री शैलेश मराठे ९४२३८९२१८२ कु मंगेश ढेबे ८१४९५५२१४३


Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 08:54 PM News publication time | Views: 277 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 08:54 PM News publication time | Views: 277 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement