अमृतच्या व्याज परतावा योजनेचा अकोल्याचे आशिष शर्मा यांना मोठा लाभ; ₹1.48 लाखांचा व्याज परतावा

अमृतच्या योजनेमुळे व्यवसायाला आर्थिक आधार; आशिष शर्मा यांना मिळाला व्याज परतावा

अमृतच्या व्याज परतावा योजनेचा अकोल्याचे आशिष शर्मा यांना मोठा लाभ; ₹1.48 लाखांचा व्याज परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोठा फायदा होत असून, या योजनेअंतर्गत अकोल्यातील श्री. आशिष शर्मा यांना कमर्शियल वाहनासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजापोटी ₹१,४८,५३४ /- (एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौतीस रुपये) इतका व्याज परतावा मंजूर करून वितरित करण्यात आला. अमृतच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा आर्थिक भार कमी होण्यास लाभार्थ्यांना मदत होत आहे. श्री. आशिष शर्मा यांनी अमृतच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त करत अमृत अकोला जिल्हा कार्यालय तसेच कार्यालयातील कर्मचारी यांचे विशेष आभार मानले. योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यामुळे हा लाभ मिळविणे सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले. अमृतच्या योजनांमुळे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन मिळत असून, अशा योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 01:56 PM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 01:56 PM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement