अमृत' संस्थेचा ₹७८,१९६/- रुपयांचा व्याज परतावा ठरला 'रामरक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स'साठी मोठा दिलासा; अडचणीच्या काळात मिळाली नवीन संजीवनी!
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या माध्यमातून दिला जाणारा व्याज परतावा हा आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. नुकताच 'रामरक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या व्यवसायाला अमृत संस्थेकडून ₹७८,१९६.०० (अठ्ठ्यात्तर हजार एकशे ९६ रुपये) एवढा व्याज परतावा थेट खात्यात यशस्वीरीत्या जमा झाला आहे.
गेल्या काही काळातील अडचणीच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत हा व्याज परतावा जमा झाल्याने 'रामरक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स'ला जणू एक नवीन संजीवनी मिळाली आहे.
वेळेवर मिळालेल्या या आर्थिक पाठबळामुळे व्यवसायाला पुन्हा नव्याने गती देणे आणि दैनंदिन व्यवहार पूर्ववत चालवणे शक्य झाले आहे.
या योजनेचा पारदर्शक आणि वेळेत लाभ दिल्याबद्दल 'रामरक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स'च्या संचालकांनी अमृत संस्था, राज्य शासन आणि संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
"अडचणीच्या काळात प्रशासनाकडून वेळेत आर्थिक मदत मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अमृत संस्थेकडून मिळालेल्या ₹७८,१९६/- रुपयांच्या व्याज परताव्यामुळे आमच्या व्यवसायाला पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले आहे." — रामरक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स
महाराष्ट्र शासनाची अमृत संस्था अशाच प्रकारे विविध क्षेत्रांतील तरुणांना व उद्योजकांना आत्मनिर्भर करण्यासाठी सातत्याने मोलाचे योगदान देत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment