दहिन्दुले गावातील अमृत ग्राम मेळाव्याला चांगला प्रतिसाद

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार अमृत ग्राम मेळावा

दहिन्दुले गावातील अमृत ग्राम मेळाव्याला चांगला प्रतिसाद मुख्य फोटो
दहिन्दुले गावातील अमृत ग्राम मेळाव्याला चांगला प्रतिसाद अतिरिक्त फोटो

नंदुरबार : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नंदुरबार तालुक्यातील दहिन्दुले गावात अमृत ग्राम मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी लक्ष्यित गटातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. अशा प्रकारचा मेळावा नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार आहे.

दहिन्दुले गावातील मेळाव्यात नागरिकांना अमृत संस्थेतर्फे विविध योजनांची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी नेहमी तत्पर असेल, अशी ग्वाही संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली. राज्यभरातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, लघुउद्योजक, स्त्रीशक्ती अशा सर्वांच्या मदतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 08:34 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 08:34 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words