विद्यार्थ्यांना कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने *GSPM राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, उदगीर* येथील प्राध्यापकांनी अमृत जिल्हा कार्यालय, लातूर येथे भेट देऊन अमृतच्या विविध योजनांची माहिती घेतली.
लातूर, दि. ३ ऑक्टोबर :* विद्यार्थ्यांना कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने *GSPM राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, उदगीर* येथील प्राध्यापकांनी अमृत जिल्हा कार्यालय, लातूर येथे भेट देऊन अमृतच्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी *श्री. इंद्राळे आर. आर., विभागप्रमुख – यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग, श्री. मारमवार पी. ए., विभागप्रमुख – विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि श्री. सोलापूरे एस. बी., प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी* यांनी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कौशल्यविकास प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाच्या संधींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमृतच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी *महाविद्यालयात विशेष माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.* या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमृतच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, प्रशिक्षणाच्या संधी आणि रोजगार व स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती देण्यात येणार आहे. या माहितीपर कार्यक्रमासाठी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर यांना आमंत्रित करण्यात येणार असून*, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी आणि अमृत मित्र श्री. अमित पांडे* यांनी प्राध्यापकांना अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालय आणि अमृतच्या समन्वयातून विद्यार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment