अमरावतीच्या अमृत विभागीय कार्यालयात ‘आरोग्य सेवा संकल्प’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमरावती : महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्याच्या समस्यांबाबत योग्य माहिती देणे आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरित करणे या उद्देशाने अमरावती येथील अमृत विभागीय कार्यालयात ‘आरोग्य सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अमरावतीच्या अमृत विभागीय कार्यालयात ‘आरोग्य सेवा संकल्प’ कार्यक्रम उत्साहात संपन्न मुख्य फोटो
अमरावतीच्या अमृत विभागीय कार्यालयात ‘आरोग्य सेवा संकल्प’ कार्यक्रम उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्याच्या समस्यांबाबत योग्य माहिती देणे आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरित करणे या उद्देशाने अमरावती येथील अमृत विभागीय कार्यालयात ‘आरोग्य सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. स्वाती बमनोटे यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, संतुलित आहार घेणे तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली. महिलांच्या दैनंदिन जीवनातील आरोग्यविषयक समस्या, आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व यावरही त्यांनी प्रकाश टाकला. महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून कुटुंबाच्या आरोग्यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महिलांनी आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली. महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सुदृढ महिला, सशक्त कुटुंब आणि निरोगी समाज’ हा संदेश या आरोग्य सेवा संकल्प कार्यक्रमातून देण्यात आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 04:28 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 04:28 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement